Astrological Consultation for Growth / ज्योतिष सल्ला

जीवनात तसेच व्यवसायात उत्तम प्रगती होण्यासाठी ज्योतिष सल्ला आणि प्रभावी उपाय मिळविण्यासाठी,

खालील माहिती शांतपणे वाचून घ्या..


श्री शिरीष कुलकर्णी भविष्य सांगत नाहीत - तर योग सांगतात !

तुमच्या प्रयत्नांना देव आणि दैवाची जोड देतात !

इथे आहे १० वर्षांचा अनुभव आणि पंधरा लाखहून अधिक फोलोवर्स !

तर व्हिडीओ मिटिंगद्वारे स्पष्ट ज्योतिष सल्ला आणि प्रभावी उपाय मिळवा !


सल्ला घेण्यासाठी तुम्ही जी फी भरता त्यात तुम्हाला काय मिळते ? तर खालील मुदयांवर साधारण 30 मिनिटे आपण चर्चा करणार आहोत; (आज फी भरली तर अपॉइंटमेंट साधारण ६० दिवसांनंतरची मिळू शकते.)


१. तुमच्या पत्रिकेचा सखोल अभ्यास करून काही दोष असल्यास ते सांगून त्यावरील उपाय ज्यामुळे अडचणींची तीव्रता कमी होत जाते. (worth 1000)

२. लाल किताब प्रमाणे काही पितृदोष आहे का ते सांगून त्यावरील उपाय ज्यामुळे दर काही वर्षांनी येणारे त्रास दूर होतात. (worth 500)

३. साडे साती व अडीचकी चा आढावा व त्यावरील उपाय ज्यामुळे शनी महाराजांचा आशीर्वाद लाभतो. ( worth 500)

४. जनन शांती किंवा अन्य कोणती शांती गरजेची असल्यास त्याची माहिती व उपाय (worth 1000)

५. व्यवसायात तसेच सर्वांगीण प्रगती होण्यासाठी काही खास उपाय - हे काही गूढ उपाय असतील ज्यामुळे तुम्हाला फायदा होत जाईल. (worth 11000)

६. अंक शास्त्राप्रमाणे - Numerological Name Correction for Growth ! नावात बदल - प्रगतीसाठी - आज सर्व सिनेस्टार तसेच अनेक यशस्वी व्यक्ती अशा प्रकारे बदल करून त्याचा उत्कर्ष होण्यासाठी फायदा करून घेत आहेत. (worth 11000)

७. अंक शास्त्राप्रमाणे - लकी नंबर, वार, क्षेत्र, रंग तसेच शत्रू अंकाची माहिती ज्यांच्या उपयोगाने आपण नुकसान होण्यापासून वाचू शकतो व जास्तीत जास्त यश मिळवू शकतो. (worth 5000)

८. कोणते रत्न किंवा रुद्राक्ष किंवा रुद्राक्ष कवच धारण केल्यास फायदा होईल - त्याची माहिती - एक असे रहस्य ज्यामुळे प्रचंड फायदा होऊ शकतो. (worth 5000)


एकंदरीत, ज्या सल्ल्याची किंमत रुपये 35000 होते तोच सल्ला तुम्हाला फक्त Rs.6700/- मध्ये मिळतो ज्यात वरील सर्व सखोल माहिती आणि सर्वात महत्वाचे म्हणजे - परीणामकारक उपाय / तोडगे तुम्हाला मिळतील.


सल्ला देऊन झाल्या नंतर सुद्धा पुढे सुचवलेल्या उपाया संदर्भात कधी काही अडचणी असतील तर शंका निरसन केले जाते. अपॉइंटमेंट साधारण ६० दिवसांनंतरची मिळू शकते.


Advantages:

1. या पेजवर ऑनलाईन पेमेंट करू शकता (UPI तसेच कोणत्याही बँक किंवा क्रेडिट कार्ड मार्फत)

2. इथे पेमेंट केल्या नंतर त्याचा स्क्रीन शॉट whatsapp वर पाठवणे मात्र आवश्यक आहे.




सूचना कृपया शांतपणे वाचून घ्या

प्रश्न : ज्योतिष सल्ला मिळवण्यासाठी नक्की प्रोसेस काय आहे ?

उत्तर : तर तुम्ही इथे फी भरता, सोबत तुमचे डिटेल लिहिता - उदा. पूर्ण नाव, जन्म तारीख, जन्म वेळ आणि जन्म ठिकाण त्यानंतर तुम्ही न विसरता whatsapp वर 7757073801 or 7028983801 या नंबर वर हीच सगळी माहिती पाठवता म्हणजे तुम्हाला अपोइटमेंट ची तारीख ऑफिस मधून कळवली जाते आणि मिटिंग पूर्वी तुम्हाला व्हिडीओ मिटींगची लिंक पाठवली जाते. ज्या दिवशी आपली व्हिडीओ मिटिंग असेल तेव्हा तुम्हाला तुमच्या सल्ला आणि त्यासोबत उपाय देखील सुचवले जातात. साधारणतः ३० मिनिट आपली गुगल मिटिंग असते ज्यामध्ये स्पष्ट ज्योतिष सल्ला आणि प्रभावी उपाय / तोडगे सुचवले जातात. अपॉइंटमेंट साधारण ६० दिवसांनंतरची मिळू शकते.


प्रश्न: सदर फी किती व्यक्तींसाठी आहे ?

उत्तर: फी हि एका व्यक्तीसाठी आहे, वेळ 30 मिनिटांचा असतो. परंतु गुगल मिटिंग दरम्यान तुम्ही तुमच्या शंका विचारू शकता काही अडचण नाही. अपॉइंटमेंट साधारण ६० दिवसांनंतरची मिळू शकते.


प्रश्न : पुण्यात राहणाऱ्या व्यक्तीस प्रत्यक्ष भेटायचे असल्यास काय करावे ?

उत्तर : गुगल द्वारे मिटिंग घेण्याचे प्रयोजन हे आहे कि तुमचा वेळ वाचावा. परंतु एक पर्याय आहे! VIP मिटिंग द्वारे तुम्ही प्रत्यक्ष भेटू शकता तसेच व्ही आय पी मिटिंग साधारणतः १५ दिवसांच्या आत मिळू शकते, तुम्हाला हवी असल्यास आम्हाला फोन करा 7028983801 या नंबर वर.


प्रश्न : इथे फी भरली म्हणजे माझी अपॉइंटमेंट फिक्स झाली का?

उत्तर : नाही, सदर पेज फक्त तुम्हाला फी भरणे सोपे जावे म्हणून आहे - फी इथे भरली की त्याचा स्क्रीनशॉट आपल्या ऑफिसच्या नंबर वर पाठवणे आवश्यक आहे तरच मीटिंग ची तारीख मिळते.


प्रश्न : जन्म वेळ नसेल तर सल्ला मिळू शकेल का ?

उत्तर : नाही मिळू शकत, परंतु जन्म वेळ अंदाजे असेल तरी चालू शकेल उदाहरणार्थ between 9am to 10am अशी एक तासाच्या मध्ये असेल तरी चालू शकेल. मात्र तसे नीट नमूद करावे.


मला whatsapp वर तुमच्या पेमेंटचा स्क्रीन शॉट पाठवण्यास विसरू नका : 7757073801 or 7028983801




श्री शिरीष कुलकर्णी

जन्माला आलोय म्हणून जगणं आणि आत्मिक समाधान मिळवण्यासाठी, मिळालेला जन्म सार्थकी लागेल अशा उद्दिष्टासाठी जगणं यात फरक असतो. मी देखील एक सामान्य आयुष्यच जगत होतो, शिकलो – नोकरी केली – लग्न केले – कुटुंबाच्या गरजा पूर्ण करत रोजचा दिवस फक्त जगायचे म्हणून जगत होतो. पण कुठे तरी एक ध्यास होता म्हणून उपासना व ध्यान देखील करत होतो कि कधीतरी “तो” प्रकाश मला आतून उजळून टाकेल. 

इयत्ता १० वी पासूनच काम सुरु केले होते, वेल्डर म्हणून, मग पेपर टाकणे, दुध टाकणे, मित्राच्या भाजीच्या गाडीवर मदत करणे, धाब्यावर म्यानेजर म्हणून तर कधी औषधाच्या दुकानात, पदवी पूर्ण होई पर्यंत तर बऱ्याच ठिकाणी काम केले – अगदी क्रेडीट कार्ड सुद्धा विकली. तसा मी एक साधा सायन्स ग्राज्युऐट, पुढे मग MBA आणि PGDBM करून हॉस्पिटल इंडस्ट्री मध्ये गेली पंचवीस वर्षे वेगवेगळ्या पोझिशन वरती काम करतो आहे. गाव खेड्यामध्ये हेल्थ चेक-अप कॅम्प करणे, अपघाताच्या ठिकाणी रुग्णवाहिका पोहोचवणे, अडचणीत असलेल्या रुग्णांसाठी मदत मिळवून देता येतीये का ते पाहणे या गोष्टी तर ओघानेच मी करत होतो – आहे. अनुभव.

लहानपणापासूनच घरातील वातावरण अध्यात्मिक असल्यामुळे आणि वडील हे श्री गुरुदेव दत्तात्रेयाचे निस्सीम भक्त असल्यामुळे निरनिराळ्या धार्मिक स्थळी भेटी झाल्या, विविध साधू संतांचे सानिध्य आणि आशीर्वाद लाभले, त्यामुळे कुठेतरी आतून अशी फार इच्छा होती कि आपली अभ्यात्मिक प्रगती देखील छान व्हावी. उपासना, ध्यान या गोष्टी चालूच होत्या परंतु “शक्ती” काही जागृत होत नव्हती अजून, आणि एक दिवस अशी वेळ आली कि मला व्यवसायात काही लाखांचे नुकसान झाले.. घर, कार, बुलेट सगळे विकावे लागले, जे स्वतः मोठ्या कष्टाने उभे केले होते ते सर्व विकून पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागणार होती .. २०१२ चा तो काळ, निराश होऊन मी गिरनार येथे दर्शनासाठी गेलो जिथे आदेश मिळाला कि गुरुदेव श्री नारायणकाका महाराजांच्या चरणी जा आणि दिक्षा घे. पुण्याला आल्या आल्या महाराजांचे दर्शन घेतले, लवकरच शक्तीपाताची दिक्षा घेतली, “प्रकाश” दिसला.. दत्त गुरूंची उपासना त्यांच्या मार्गावरच घेऊन गेली. मनोबळ इतके वाढले कि जितके गमावले, आज त्याच्या कितीतरी पट पुन्हा कमावले आहे. अध्यात्म.

शाळकरी वयापासून जगलेला संघर्ष, अचानक आलेले भयंकर संकट आणि साधनेमुळे पुन्हा मिळालेली उभारी... तेव्हापासून असे वाटू लागले कि आपण देखील अडचणीमध्ये असलेल्या लोकांना योग्य वेळी योग्य असा मार्ग दाखवला पाहिजे. जे मी शिकलो आणि आजही शिकतोच आहे ते ज्योतिषशास्त्र, tarot कार्ड, रून स्टोन किंवा अंकशास्त्र हि सगळी फक्त एक माध्यम आहेत.. प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी, एक अंदाज घेण्यासाठी, योग्य दिशा ठरवण्यासाठी.. परंतु त्या सोबत साधनेचे सामर्थ्य असेल तर मिळणारे परिणाम खूपच चांगले असतात. अनुभूती. 

माणसाचे कर्तुत्व, कर्म किंवा प्रयत्न हे ९९ टक्के असतात आणि फक्त एक टक्का असतो देव किंवा दैवाचा... मी फक्त तुमच्या कर्तुत्वाला देव किंवा दैवाची जोड देण्याचा प्रयत्न करतो आहे..


FB logo

Instamojo

Want to create landing pages for your business? Visit Instamojo Smart Pages and get started!